• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

नगरसेवकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप; दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रारी
प्रमोद डोंगरे
तालुका प्रतिनिधी पातुर

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

पातूर : नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच राजकीय वैमनस्यातून पातूर शहरात माजी नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी बाळापूर रोड परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुरान सय्यद नबी आणि प्रभाग क्रमांक एकमधून विजयी झालेले नगरसेवक मोहम्मद शाकीर यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. नगरसेवक मोहम्मद शाकीर यांच्या पत्नीने माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुरान यांच्यावर छेडखानी व विनयभंगाचा आरोप केला आहे.

तक्रारीनुसार, माजी नगराध्यक्ष यांच्या सांगण्यावरून काही व्यक्ती आपल्या घरी आल्या आणि ‘तुमच्या विरोधात तिन अपत्याची

टाकलेली तक्रार मागे घेण्याकरीता, बुरान भाई यांच्याकडे चला,’ असे म्हणत आपल्याला जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेवकाच्या पत्नीने केला आहे. आपण नकार दिल्यानंतरही जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केल्याची माहिती आहे.

दरम्यान, याच प्रकरणात माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुरान यांनीही तक्रार दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मोहम्मद शाकीर आणि त्यांच्या पत्नीने आपल्याला मारहाण केली तसेच बाळापूर रोडवरील आपल्या आरा मशीनमध्ये घुसण्याचा व जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला असल्याची माहीती आहे

सदर घटना बाळापूर रोडवरील एका दुकानासमोर दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर दोन्ही गटांचे समर्थक पातूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी झाली होती.

दरम्यान, पातूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय वैमनस्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती आहे.

Tags: pramod dongare
Previous Post

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In