• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in प्रेस नोट, महाराष्ट्र
0
जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

” कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही” – एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत स्पष्ट इशारा

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

माहूर प्रतिनिधी –

किनवट पंचायत समिती येथे गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची बैठक किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मतदारसंघातील आरोग्य सेवा, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत आमदार भीमराव केराम यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देत कामातील दिरंगाई, हलगर्जीपणा व निष्काळजीपणाबाबत कडक शब्दांत तंबी दिली. “सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. कोणत्याही अधिकाऱ्याकडून कामात टाळाटाळ किंवा दिरंगाई झाल्यास ती सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना केली असून, आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे ही समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

बैठकीस पंचायत समिती किनवटच्या गटविकास अधिकारी सौ. जयश्री वाघमारे, पंचायत समिती माहूरचे गटविकास अधिकारी श्री. ज्ञानेश्वर टाकरस, समितीचे सचिव डॉ. के. पी. गायकवाड, भाजप विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे, माजी सभापती दत्ता आडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे निर्देश आमदार केराम यांनी दिले.

बैठकीच्या शेवटी जनहिताची कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करून प्रशासनाने लोकाभिमुख आणि उत्तरदायी कार्यपद्धती स्वीकारावी, असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

Next Post

उघडा डोळे, बघा नीट… मोढा परिसरातील नागरिकांचा तीव्र संताप!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
उघडा डोळे, बघा नीट… मोढा परिसरातील नागरिकांचा तीव्र संताप!

उघडा डोळे, बघा नीट… मोढा परिसरातील नागरिकांचा तीव्र संताप!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In