मोहोळ तालुका प्रतिनिधी/
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत तर दुसरीकडे या पावसाचा शेतकर्यांना मोठा फटका बसतो आहे, सोलापूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून दिवसभर थोडा विसावा घेऊन रात्रभर मुसळधार पडतो आहे, यामुळे छाटणीला आलेल्या द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने आक्टोबर छाटणी हंगाम सततच्या पावसामुळे लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे,
परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला असून वर्षातून एकदाच येणाऱ्या या पिकाचे नियोजन देखील कोलमडून पडले असून उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, वाढत्या रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारात बनावट औषधांचा वाढता वावर यामुळे औषधे फवारून देखील भुरी, मावा आदी सारखे रोग आटोक्यात येवू शकत नाहीत, त्यामुळे ड्रीपद्वारे पोषके, खते, औषधे देऊनही पाहिजे तशी फळधारणा होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकर्यांचे नियोजन कोलमडून पडले आहे,
यावर्षी सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे द्राक्षे हंगाम यशस्वी होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असतानाच परतीच्या पावसाने सर्वच पिकांची पुरती वाट लावली आहे, सुरुवातीला नगदी हमखास दोन पैसे मिळवून देणारे हे पिक आता अलिकडच्या काळात जुगार ठरू लागले आहे- रोषन पवार (कापसेवाडी, द्राक्षे उत्पादक शेतकरी)
Discussion about this post