एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे पिंपळगाव हरेश्वर येथील मूकबधिर निवासी विद्यालय येथे ४० मूकबधिर विद्यार्थ्यांना केळी व बिस्किट वाटप करून मूकबधिर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.
एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था ही समाजातील प्रत्येक कार्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले. प्रथमता एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी एकता दिव्यांग संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी मूकबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ईश्वर पाटील, शिक्षक गोविंद महाजन, प्रतिभा वाघ, प्रवीण सूर्यवंशी, अमोल माळी व इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि मूकबधिर विद्यालयातील ४० विद्यार्थी उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष व दिव्यांग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत, विकास शिवदे भोई, बाळू जाधव, विठ्ठल धनगर, अनिल चौधरी, अनिल राजपूत व पिंपळगाव येथील दिव्यांग बांधव ओम ढाकरे उपस्थित होते.
Discussion about this post