नायगाव तालुका प्रतिनिधी…दिपक गजभारे घुंगराळेकर… बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक अनिल कोंडीबा गायकांबळे यांची भारतीय बौद्ध महासभेच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी नुकतीच एका बैठकीत जिल्हाध्यक्ष पी.एम.वाघमारे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील चिटमोगरा येथील जि.प.शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल गायकांबळे यांना धम्म चळवळीचे विशेष आकर्षण आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त वंचित शोषितांप्रती केलेल्या अनंत उपकाराची कृतज्ञता गायकांबळे यांच्या कृती आणि वाणीतून पदोपदी जाणवते.
धम्मकार्यात रस असलेल्या अनिल गायकांबळे यांची भारतीय बौद्ध महासभेच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष पी.एम वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत त्यांना तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.
अध्यक्ष गायकांबळे यांच्यासह सरचिटणीस पदी निवृत्ती धानोरकर , कोषाध्यक्ष नागोराव डुमणे तर उपाध्यक्ष म्हणून गौतम जोंधळे (संस्कार) , शशिकांत सोनसळे (संरक्षण ) , राहुल भद्रे (संरक्षण ), मालोजी झगडे (संस्कार ) , सचिव संजय वालंबे (संस्कार ), रोहिदास गायकवाड (संरक्षण) , ज्योतिबा वाघमारे ( पर्यटन ), संजय गायकवाड (संरक्षण ), उत्तम वारघडे ( पर्यटन), हिशोब तपासणीस म्हणून दीपक एडके तर कार्यालयीन सचिव साहेबराव मांजरमकर आदींचा या कार्यकारणीत समावेश करण्यात आला.
दरम्यान बाबासाहेबांनी धम्मक्रांतीसाठी स्थापन केलेल्या या मातृसंस्थेचा अध्यक्ष झाल्याचा मला अभिमान वाटतो आणि तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी नेटाने पार पडणार असल्याचे सांगून ही धम्मचळवळ गतिमान करणार असल्याची प्रतिक्रिया नुतन तालुकाध्यक्ष अनिल गायकांबळे यांनी दिली….गायकांबळे हे बहुजन आधिकारी कर्मचारी महासंघाचे यापूर्वीच जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावर आता भारतीय बौध महासभेच्या नायगाव तालुकाध्यक्षपदाची नव्याने निवड झाल्याने आता दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे…..
Discussion about this post