युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध प्रवीण इंगळे —- उमरखेड तालुका प्रतिनिधी मो 7798767266उमरखेड येथे सूक्ष्म,लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमांनुसार, स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आयोजन आयएसओ मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि. आणि इंदिरा गांधी कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26 ते 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. भरतीला परिसरातील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
26 सप्टेंबर रोजी सुमारे 82 युवकांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी 62 युवकांची नोकरीसाठी निवडकरण्यात आली.
27 सप्टेंबरला 80 युवकांनी सहभाग घेतला, त्यापैकी 78 युवकांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले. तर 28 रोजी 90 युवकांपैकी 80 युवकांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले ही भरती प्रक्रिया येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा उमरखेड येथे सुरू आहे.
अधिकाधिक सुशिक्षित आहे.बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस एस सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड चे महेश सरतापे व चंद्रशेखर राव यांनी केले आहे .
Discussion about this post