येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. १०/०९/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपीतांनी येवला अंदस्सुल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाचे पाठीमागील बाजुचे शटर तोडून दुकानात बेकायदेशीर-स्त्यिा प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले एल.ई.डी. टीव्ही, सिलींग फॅन, कुलर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु तसेच तांब्याची व पितळाची भांडी असा एकुण २,७०,४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. सदर घटनेबाबत येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं ४८०/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिस्खेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री. बाजीराव महाजन यांनी वरील घटनेच्या अनूषंगाने सविस्तर माहिती घेवून येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक यांची पथके सदर गुन्हयावा संयुक्त तपास करत होते. सदर गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, मुव्हयातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून पोलीस पथकांनी गोपनीय माहिती काढून, सदस्वा गुन्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वाळुंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलीसांनी वाळुंज एम.आय.डी.सी., जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
१) गुलाम रफिक शेख, वय ४०, रा. हिदायत नगर, वाळुंज बु।।, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. २) दिपक लाचु ठुने, वय १९, रा. वांगेभरारी, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
सदर आरोपींना वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे वाळुंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार संतोष कांबळे, करण कांबळे व इतर साथीदार यांचेसह गेल्या पंधरा दिवसांपुर्वी येवला तालुक्यातील अंदरसुल शिवारात एका फर्निचर दुकानाचे शटर तोडुन इलेक्ट्रॉनिक साहित्य, तांबे/पितळावे भांडे चोरून नेल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेतलेले आरोपीचे कब्जातून वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेला छोटा हत्ती वाहन, गुन्हयात चोरीस गेलेले ०३ एल.ई.डी. टिव्ही, ७७ किलो वजनाची तांब्याची भांडी व १४ किलो वजनाची पितळाची भांडी असा एकुण ०२ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी संतोष कांबळे व करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथके त्यांचा कसोशिने शोध घेत असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री. बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक, पोउनि हर्षवर्धन बहिर, स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभीरे, येवला तालुका पो.स्टे. चे पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील, राजेंद्र बिन्नर, सचिन वैरागर, दिनकर पारधी, गणेश बागुल, सागर बनकर, नितीन पानसरे, पंकज शिंदे, दिपक जगताप, तसेच स्थागुशा पोहवा गिरीष निकुंभ, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.
Discussion about this post