• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंदाणे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१०(प्रतिनिधी)
मंदाणे ता. शहादा येथे शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा एक’चे आयोजन शुक्रवारी दि.१० एप्रिल रोजी मंदाणे मंडळ कार्यालयात करण्यात आले. या शिबिरास परिसरातील लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल


शहाद्याचे तहसीलदार संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व विभागीय अधिकाऱ्यांचे स्वागत ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी व महेश ठाकरे यांनी केले.या शिबिरात विविध शासकीय विभागांनी स्टॉल्स लावून नागरिकांना मार्गदर्शन केले.ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी यांनी अद्ययावत नियम, ७/१२ उतारा व विविध दाखल्यांबाबत माहिती दिली.पुरवठा विभागाचे दिलीप पाडवी यांनी योजनांची माहिती दिली, तर कुमारी कीर्ती बेंडकुळे यांनी रेशन कार्ड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.संजय गांधी निराधार योजनेबाबत शिरीष परदेशी यांनी मार्गदर्शन करून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मंजुरी आदेशांचे वाटप केले.

कृषी व आरोग्य विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान आणि आरोग्य योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.मंडळ अधिकारी शशिधर सावळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उत्कृष्ट नियोजन केले होते. कार्यक्रमाची रूपरेषा शिरीषचंद्र परदेशी यांनी आखली होती.
या प्रसंगी उपसरपंच शरद साळुंखे, धरमसिंग पावरा, माजी जि.प. सदस्य दीपक भिल, मंदाणे पोलीस पाटील, विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश ठाकरे, रेहमल पावरा, आशिष नरवाडे, श्रीमती जयश्री जटारे, चेतन शेळके,रतनसिंग राजपूत व महसूल सेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण कोळी यांनी केले.

चौकट -:
“शासकीय योजनांना गती देण्यासाठी आणि प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत नेण्यासाठी हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.”
संभाजी पाटील (तहसीलदार, शहादा)

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

जळकोट येथे भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा

Next Post

तहसीलदारच्या आदेशाची केली अवहेलना. गाव नकाशावरील रस्ता शेजाऱ्यांनेच अडविला ?

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
9
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
26
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post

तहसीलदारच्या आदेशाची केली अवहेलना. गाव नकाशावरील रस्ता शेजाऱ्यांनेच अडविला ?

ताज्या बातम्या

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In