विद्यार्थ्यांकडून नाटक व भाषणाद्वारे संविधानाचे महत्त्व स्पष्ट; कर्तव्ये आणि अधिकारांवर मार्गदर्शन
वाळूज | प्रतिनिधी :
मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटक आणि भाषणांच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बोराडे सर होते. त्यांनी संविधानातील नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये आणि त्यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान आशिष सर उपस्थित होते. तसेच प्रियंका बोरुडे, अनुराधा तूपशेंद्रे, अनिता औताडे, सपना वाघ, समीना पटेल, वैशाली बर्वे, प्रतीक्षा नाबदे आणि राम माने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या आव्हाळे यांनी केले, तर अनुराधा तूपशेंद्रे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटक आणि भाषणांतून संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांविषयी जनजागृती करण्यात आली.











