संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सामूहिक वाचन
कारेगाव | प्रतिनिधी :
भारतीय संविधानाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृती मिळाल्याच्या ऐतिहासिक दिनानिमित्त कारेगाव येथील श्री. डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात गुरुवारी संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उभे राहून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. ‘आम्ही भारताचे लोक…’ या शब्दांनी शालेय परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाला शिक्षक अनिल खंदारे, धनश्री करपे, दत्तात्रेय कर्डिले, निकिता जाधव, योगिता पवार, बाळासाहेब कोहोकडे, सखाराम चव्हाण, सतीश सरोदे आणि ज्योती उघडे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.










