चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा सहभाग
रायपाटण | वार्ताहर :
रायपाटण येथील जिजामाता विद्यामंदिरात २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुंभार यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार व कर्तव्ये तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची माहिती दिली.
संविधान दिनानिमित्त विद्यालयात चित्रकला, रांगोळी आणि संविधान विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने प्रभात फेरीही काढण्यात आली. विद्यालयात संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.
चित्रकला स्पर्धेचे निकाल
- प्रथम क्रमांक : अथर्व कांबळे
- द्वितीय क्रमांक : दर्शन हिरेमठ
- तृतीय क्रमांक : दिव्या जंगम
रांगोळी स्पर्धेचे निकाल
- प्रथम क्रमांक : तपस्या गुरव, श्रमिका कामतेकर, आर्या पवार व मधुरा मालप
- द्वितीय क्रमांक : संमिका शेट्ये, ऋणाली वाडेकर, शर्वरी कामतेकर, तपस्या खोचाडे व श्रेया सावंत
- तृतीय क्रमांक : दिव्या जंगम, तन्वी मालप व श्रुतिका राहाटे
प्रश्नमंजुषा स्पर्धेचे निकाल
- प्रथम क्रमांक – शिवकन्या गट : ऋणाली वाडेकर व संमिका शेट्ये
- द्वितीय क्रमांक – छत्रपती शिवाजी महाराज गट : वैष्णव मयेकर व मयुरेश चापले
- तृतीय क्रमांक – संविधान गट : अथर्व पाथरे व अथर्व कांबळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गटात गुरुदत्त चांदे व अथर्व पवार सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुनील कुंभार, माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, सहाय्यक शिक्षक गौतम पांगरीकर, सुरेश कांबळे आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.










