• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जालना शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

विप्र फाउंडेशनतर्फे १८ व १९ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर, भव्य शोभायात्रा, व्याख्यान, महाआरती व भक्तिमय संध्या

समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

RelatedPosts

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

जालना | प्रतिनिधी
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ निमित्त जालना शहरात दोन दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. विप्र फाउंडेशन, जालना (छत्रपती संभाजीनगर झोन १२-सी) यांच्या पुढाकाराने १८ व १९ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमांना समाजातील सर्व बंधू-भगिनी, मातृशक्ती व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जनकल्याण रक्तकेंद्र, दवा बाजार येथे रक्तदान शिबिराने होणार आहे. समाजोपयोगी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता नवग्रह मंदिर, मस्तगड येथून श्रीराम मंदिर, मोठी सडकपर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत युवक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असून शहरात जय परशुरामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमणार आहे.
रविवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नाथबाबा मंदिर येथून मोठी सडक मार्गे रूपम हॉलपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सजविलेल्या रथ, धार्मिक पताका, पारंपरिक वेशभूषा आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही शोभायात्रा विशेष आकर्षण ठरणार आहे.
यानंतर रूपम हॉल येथे सकाळी १०.३० वाजता “धर्म, पराक्रम आणि सत्याचा संगम – भगवान परशुराम” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेदांग ज्योतिष गुरुवर्य नागेश गुरुजी पाथ्रुडकर हे आपल्या प्रभावी वक्तृत्वातून मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी ११.४५ वाजता पुरस्कार वितरण व स्वागत समारंभ, दुपारी १२.१५ वाजता महाआरती तसेच १२.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी खंडेलवाल समाज व आद्य गौड समाज यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

उत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे रविवार रात्री ८ वाजता श्री संकट मोचन हनुमान मंदिर, जिजामाता द्वार येथे “एक संध्या भगवान परशुरामांच्या नावाने” हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. गोवत्स परिवार, जालना यांच्या वतीने भजन, संकीर्तन व भक्तिरसाने ओतप्रोत सादरीकरण करण्यात येणार आहे.या निमित्ताने विप्र समाजातील सर्व बंधू-भगिनींना उत्सवात उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन आचार्य सत्यनारायण व्यास, प. पू. मनोज महाराज गौड, भक्तमाल कथा प्रवक्ता किशोर तिवारी, छत्रपती संभाजी नगर झोन अध्यक्ष रामनिवास गौड, संघटन महामंत्री पवन जोशी, अध्यक्ष जयप्रकाश श्रीमाली, सचिव पंडित विजयकुमार व्यास, कोषाध्यक्ष ललित बिजावत, युवा व महिला विभागाच्या वतीने विप्र युवा अध्यक्ष परीक्षित शर्मा, सचिव संतोष खंडेलवाल, विप्र महिला समिती अध्यक्षा सौ. जया शर्मा, सचिव सौ. मंजू श्रीमाली, कोषाध्यक्ष सौ. अरुणा पारिक, विप्र बहुमंडल अध्यक्षा सौ. प्रियंका दायमा, सचिव सौ. आदिती गौड, कोषाध्यक्ष सपना सारस्वत, आद्य गौड समाज अध्यक्ष किशोर मिश्रा, सचिव संजय शर्मा; खंडेलवाल समाज अध्यक्ष कैलास खंडेलवाल, सचिव महेश खंडेलवाल; दायमा समाज अध्यक्ष विनोद दायमा, सचिव रवींद्र दायमा ;

सारस्वत समाज अध्यक्ष चंद्रकांत शर्मा, सचिव मुरारीलाल सारस्वत; शाक द्विपीय मग ब्राह्मण समाजअध्यक्ष ललित बिजावत,सचिव प्रवीण शर्मा; गुजर गौड समाज अध्यक्ष उमेशजी पंचारिया, सचिव दुर्गेशजी उपाध्याय; पारिक समाज अध्यक्ष पवन जोशी, सचिव पंडित विजयकुमार व्यास, श्रीमाली समाज अध्यक्ष दिलीप व्यास, सचिव दीपेश व्यास, बंकटलाल खंडेलवाल, सुरेश उपाध्याय, लक्ष्मीनारायण खंडेलवाल, दिलीप गौड, चंद्रप्रकाश श्रीमाली, सूर्यप्रकाश ओझा, अशोक शर्मा, विशाल शर्मा, राजेश उपाध्याय,मनोज जोशी, गौरव बोरा, कुशल गौड,हितेश जोशी, वरुण शर्मा, रोहित गौड, रणवीर मिश्रा, गोपाल पंचारिया, रामदेव श्रोत्रीये , जुगलकिशोर श्रोत्रीये, ओमप्रकाश दायमा, रामेश्वर जोशी, मनोज दायमा, सुरेश शर्मा, रवींद्र अबोटी , राहुल ओझा, राकेश पारिक, राजेश गौड, संजय सारस्वत, प्रतीक सारस्वत, शैलेश शर्मा, जगदीश गौड, भगवान दायमा, नारायण दायमा यांनी आवाहन केले आहे.
आयोजकांनी सांगितले की, “समाजाची एकता, धर्मसंस्कारांचे जतन आणि युवा पिढीमध्ये सांस्कृतिक जागृती निर्माण करण्यासाठी हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे.

Ad 1
Previous Post

चुरमुरा येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

Related Posts

Blog

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

October 16, 2026
0
Blog

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026
3
Blog

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

October 16, 2026
0
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!
Blog

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

October 16, 2026
0
आठवणींतले नाना… एक माणूस, अनेक आठवणी आणि भरून आलेले मन!
Blog

आठवणींतले नाना… एक माणूस, अनेक आठवणी आणि भरून आलेले मन!

October 16, 2026
0
पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा
Blog

पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

October 16, 2026
7
Next Post
श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे

ताज्या बातम्या

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

October 16, 2026

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In