• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in Blog
0
मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणारी युवा संघ, एसएमबीटी हॉस्पिटल आणि ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम; ग्रामीण भागात दर महिन्याला आरोग्य शिबिरे घेण्याचा निर्धार

मऱ्हळ बुद्रुक, ता. सिन्नर | प्रतिनिधी :

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २८ नोव्हेंबर २०२६ रोजी मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. एसएमबीटी हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायत मऱ्हळ बुद्रुक यांच्या सहभागातून हे शिबिर पार पडले. शिबिरात एकूण २०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

RelatedPosts

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

शिबिराच्या अध्यक्षस्थानी लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय संवत्सरकर होते. भाऊसाहेब इंगळे, श्रावण आढाव, निर्मला संवत्सरकर, ज्योत्स्ना कुऱ्हे आणि नितीन कुऱ्हे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष सुरज आढाव यांनी केले.

शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, दंतरोग, अस्थिरोग आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ईसीजी आणि दंत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिरातील तपासण्या मोफत करण्यात आल्या. पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना अल्प दरात किंवा शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्याचे नियोजन करण्यात आले.

एसएमबीटी हॉस्पिटलच्या पथकातील डॉ. यश पाटील, डॉ. वैशाली इंगळे, डॉ. अंजली पवार, डॉ. दिव्या, डॉ. अथर्व उगले, डॉ. अंकिता, डॉ. दैविक, डॉ. प्रणाली शिरसाठ, डॉ. पुष्पा भांगरे आणि डॉ. पूजा डेरले यांनी रुग्णांची तपासणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरे, आरोग्यसेवक पगार, हेल्थ इन्स्पेक्टर वाघमोडे, जोशी तसेच आशा सेविका कविता आढाव, सिंधू भालेराव, घेगडमल, बैरागी भालेराव, सगर आणि पूजा कचोळे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

शिबिराच्या आयोजनासाठी संघाचे कार्याध्यक्ष मयुरेश कुऱ्हे, खजिनदार अनिल इंगळे, तालुकाध्यक्ष नितीन कुऱ्हे, किशोर कुऱ्हे, कैलास आढाव, सल्लागार राकेश कुऱ्हे, यश कुऱ्हे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत कुऱ्हे, प्रवीण गेंद, संचालक सुनील संवत्सरकर, ऋषिकेश धोक्रट, युवराज कुऱ्हे, शुभम कुऱ्हे, संकेत संवत्सरकर, कुशाल संवत्सरकर आणि भुरा उंडे यांनी परिश्रम घेतले. सल्लागार ललित संवत्सरकर यांनी आभार मानले.

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी दर महिन्याला ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष विजय संवत्सरकर यांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

Next Post

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

Related Posts

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती
Blog

1
करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी
Blog

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

November 28, 2026
12
Auto Draft
Blog

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

November 28, 2026
17
पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी
Blog

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

November 28, 2026
25
विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’
Blog

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

November 28, 2026
170
Next Post
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

ताज्या बातम्या

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

November 29, 2026
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

November 29, 2026
मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In