भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वणी विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे यांचे मार्गदर्शनात जिल्हा सहसचिव कॉ.बंडु गोलर,तालुका सचिव कॉ.लता रामटेके,कॉ.रंजना टेकाम यांचे नेत्रुत्वात गेल्या दहा वर्षापासुन मारेगाव शहरात कायमस्वरूपी बसस्थानक व्हावे यासाठी मोर्चा,आमरण उपोषण,धरना,रास्ता रोको व अन्य स्वरूपात सतत आणी सातत्याने आंदोलने करीत होते.
या प्रश्नाला सोडविण्यासाठी स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना विधानसभेत बसस्थानक मंजुर करवुन घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला आणी आमदारांनी भाकपला दिलेला शब्द पुर्ण करून बसस्थानक मंजुर करवुन घेतले.
आमदार बोदकुरवार यांनी मारेगाव येथे येऊन रीतसर निर्माणाधिन बसस्थानकाचे प्रणेते कॉ.बंडु गोलर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.आणी अखेर भाकपच्या आंदोलनाला व आमदार बोदकुरवार यांचे प्रयत्नाला व संघर्षाला यश आले.
मारेगाव तालुक्यातील बस स्थानकाचा प्रश्नाला घेऊन गेल्या 10 वर्षापासून लाल बावटा घेऊन रस्त्यावरील आंदोलनात सहभागी होणारया सर्व कार्यकर्त्यांचे यावेळी आमदारांनी व प्रशासन तथा मारेगाव वासीयांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे.



Discussion about this post