प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण. संपर्क:९९३०७५१२५७ दिनांक 29 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी संध्याकाळी सिद्धिविनायक हॉल भोईर वाडी कल्याण येथे खान्देश कुंभार समाज मंडळ कल्याण च्या वतीने वार्षिक स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी माननीय श्री सतीश दादा दरेकर अध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री.शरद वाडेकर (शासकीय कामकाज व स्पर्धा परीक्षा) हे उपस्थित होते.
तसेच श्री.भगवान सूर्यवंशी व श्री.रघुनाथ कुंभार,जेष्ठ समाजबांधव श्री.रंगराव मोरे,मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश मोरे,सचिव श्री.भगवान कुंभार,आनंद कुंभार,भालेराव साहेब,राम पाहणेरकर,भास्कर कल्याणकर,अमोल केमबुंलकर, डॉ.काळे साहेब इ.कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश चे मान्यवर मंचावर उपस्थित होते.समाजातील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.विशेष सन्मान म्हणून पोलीस उप निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले श्री.देवानंद चव्हाण यांचा शाल,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन निता मोरे,कल्पना बोरसे,नरेंद्र मोरे,विलास मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.लक्ष्मण पगारे, संजीव सोनवणे,अनिरुद्ध चव्हाण,चेतन मोरे,प्रकाश बोरसे,जगदीश मोरे,मधुकर कुंभार,अर्जुन बोरसे,प्रकाश बोरसे,नारायण महाले,राजाराम बच्छाव, कैलास बच्छाव,विकास मोरे,योगेश मोरे,विजय मोरे,विलास महाले,आत्माराम सोनवणे व समस्त कुंभार समाज मंडळ कल्याण च्या सभासदांनी सहकार्य केले. कल्याण परिसरातील 250 समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.समाज संघटीत होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मान्यवरांनी केले.उपस्थितांचे आभार श्री.एकनाथ सोनवणे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post