• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘स्पंदन २०२६’ राज्यस्तरीय युवक महोत्सवात ‘निदान’ लघुपटाला प्रथम पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाची राज्यस्तरावर चमक

लातूर, दि. १६ :
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने राज्यस्तरीय ‘स्पंदन ललित कला २०२६’ युवक महोत्सवात उल्लेखनीय यश संपादन करत लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘निदान’ या लघुपटाने प्रभावी कथा, उत्कृष्ट अभिनय आणि समाजमनाला भिडणाऱ्या आशयाच्या जोरावर परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

पुणे येथील ढोले पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय महोत्सवात राज्यभरातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विविध कला प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या. अत्यंत चुरशीच्या वातावरणात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘निदान’ या लघुपटातून ‘षड्रिपू’ या संकल्पनेवर आधारित प्रभावी मांडणी करत सर्वांचे लक्ष वेधले.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या मानवी जीवनातील षड्रिपूंचा व्यक्तीच्या आयुष्यावर होणारा परिणाम, मानसिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण या लघुपटात करण्यात आले होते. आधुनिक जीवनशैलीतील वाढत्या मानसिक ताणतणावांवर भाष्य करणारा हा लघुपट विचारप्रवर्तक ठरला.

या लघुपटाचे दिग्दर्शन व पटकथा लेखन अंतिम वर्षातील विद्यार्थी आफताब मशायक यांनी केले. प्रियंका महाजन आणि अंजली थोंबाळ यांनी संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली. धम्मसंकेत सपकाळ आणि संकेत बनसोडे यांनी छायाचित्रण केले, तर अबरार खान यांनी संपादनाची धुरा सांभाळली.

लघुपटातील अभिनय, पार्श्वसंगीत, तांत्रिक हाताळणी आणि प्रभावी सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. या लघुपटात आफताब मशायक, साक्षी साखरे, सुप्रिया कुंभार, अंजली थोंबाळ, आदिती गंगावणे, अथर्व अनावडे, गणेश वाघमारे, पियुष बोरसे आणि प्राजक्ता शेप यांनी भूमिका साकारल्या.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना डॉ. आनंद रेड्डी आणि डॉ. श्रुती ताडमारे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, डॉ. श्रुती ताडमारे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबत कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

सुरेशदादा जैन औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

Next Post

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
2
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
11
Next Post
दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In