सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
२०२१ यावर्षीचा कृषी विभागाच्या वतीने जाणारा राज्यस्तरीय कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील गोरखनाथ कचरू गोरे यांना जाहीर झाला असून २९ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे होणार आहे. २ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास राज्यपाल के पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गोरखनाथ गोरे यांनी त्यांच्या शेतात डाळिंब, शेवगा, जांभूळ,सिताफळ मिश्र फळबाग तसेच गांडूळ प्रकल्प त्यामध्ये गांडूळ खत, गांडूळ बीज, गांडूळ बेड या सेंद्रिय निविष्ठा वापरून सेंद्रिय शेती करत आहे याची दखल घेऊन गोरखनाथ गोरे महाराष्ट्र शासन कृषी विभाग हा पुरस्कार जाहीर केला
Discussion about this post