• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरच्या राजकारणात नवी चर्चा; नगरसेवक अभिजीत पाचर्णे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिरूरच्या राजकारणात नवी चर्चा; नगरसेवक अभिजीत पाचर्णे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार?
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे प्रतिनिधी –

शिरूर, जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध इच्छुकांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक अभिजीत गणेश पाचर्णे हे विधान परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा सध्या शिरूरच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पुणे विभागातून होणाऱ्या या निवडणुकीत नगरपरिषद व नगरपंचायतींचे नगरसेवक मतदान करणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या जवळपास समान असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपापली तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत गणेश पाचर्णे यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू असल्याचे समजते. त्यांनीही ही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. येत्या काही दिवसांत या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिजीत पाचर्णे यांनी २०१६ मध्ये शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवत नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू केला होता. त्या काळात त्यांनी बांधकाम सभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळत विविध विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. सध्या २०२५ च्या कार्यकाळात ते स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे या सध्या शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून कार्यरत असून पाचर्णे कुटुंबाचे शिरूरच्या राजकारणातील वाढते वजन चर्चेचा विषय ठरत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूरमधून पुन्हा एकदा युवा नेतृत्व पुढे येत असल्याचे चित्र दिसत असून अभिजीत पाचर्णे यांच्या संभाव्य उमेदवारीकडे आता राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

गागोदे खुर्द गावात चावऱ्या कुत्र्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांचा मोठा त्रास, अखेर नागरिकांनी घेतली खबरदारीची भूमिका

Next Post

राष्ट्रीय जनगणना कामात गैरहजर; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

राष्ट्रीय जनगणना कामात गैरहजर; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In