• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सरसकट कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये अनुदान, पीकविमा आणि हमीभावाची मागणी; ४ डिसेंबरला बुलढाण्यात दौऱ्याचा समारोप

किनगाव राजा | प्रतिनिधी :

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असून, गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान आज किनगाव राजा येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या.

RelatedPosts

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

तथास्तु फाउंडेशनतर्फे सिंदेवाही येथे गुरु नानक देवजी यांची जयंती साजरी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मुजोरी थांबवावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच सरसकट एक लाख रुपये प्रतिहेक्टर अनुदान मंजूर करावे, अशी मागणी तुपकर यांनी केली. याशिवाय २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांचा हक्काचा पीकविमा शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.

जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या दावणीवरच चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच कापूस आणि सोयाबीनला योग्य हमीभाव मिळावा, असा मुद्दाही त्यांनी सभेत मांडला.

या दौऱ्याचा समारोप ४ डिसेंबर २०२६ रोजी बुलढाणा येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी किंवा समस्या असल्यास त्यांनी त्या लेखी स्वरूपात घेऊन ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तुपकर यांनी केले. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह, गावातील इतर शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेऊन स्वतःच्या वाहनाने बुलढाणा येथे यावे, असेही त्यांनी सांगितले.

या सभेला शेतकरी योद्धा बालाजी सोसे, परवीन गीते, सतीश वायाळ, नितीन सानप, कैलास पंडित, गजानन ढोबळे, आमदार रमेश सानप, रंगनाथ आप्पा मुंडे, पांडुरंग पंडित, विठ्ठल वलटे, राजेश काकडे, विलास झोरे, डॉ. नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 1
Tags: Akshay Munde
Previous Post

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

Related Posts

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन
ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

November 26, 2026
2
तथास्तु फाउंडेशनतर्फे सिंदेवाही येथे गुरु नानक देवजी यांची जयंती साजरी
ताज्या घडामोडी

तथास्तु फाउंडेशनतर्फे सिंदेवाही येथे गुरु नानक देवजी यांची जयंती साजरी

November 26, 2026
3
पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी
ताज्या घडामोडी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

November 25, 2026
4
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
ताज्या घडामोडी

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
8
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण
ताज्या घडामोडी

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026
6
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले
ताज्या घडामोडी

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

November 25, 2026
11

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

November 26, 2026
सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

November 26, 2026
तथास्तु फाउंडेशनतर्फे सिंदेवाही येथे गुरु नानक देवजी यांची जयंती साजरी

तथास्तु फाउंडेशनतर्फे सिंदेवाही येथे गुरु नानक देवजी यांची जयंती साजरी

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In