प्रतिनिधी
गो.से. महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी महाविद्यालयातील NCC युनिटच्या कॅडेट्सनी केली आहे. विविध सैन्य व पोलिस दलांमध्ये महाविद्यालयातील कॅडेट्सची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाविद्यालयातील कॅडेट विशाल यादव यांची Assam Rifles मध्ये तर कॅडेट यश पाल यांची Territorial Army मध्ये निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस दलामध्येही महाविद्यालयाच्या कॅडेट्सनी यश संपादन केले असून कॅडेट विशाल देशमुख यांची बुलढाणा पोलिस दलात, कॅडेट मिलिंद अनेकर यांची नागपूर पोलिस दलात तसेच कॅडेट सचिन गायगोळ यांची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.
या यशामुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. NCC मधील शिस्त, मेहनत, जिद्द आणि देशसेवेची भावना यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक वर्ग तसेच NCC विभागाच्या वतीने सर्व निवड झालेल्या कॅडेट्सचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











