संजय भोजने शालेय जीवनापासून ते महाविद्यालयात शिक्षण घेण्यापर्यंत आवडीनुसार खेळ खेळावेत, खेळामुळे जीवनात प्रगती होते असे प्रतिपादन माजी आ. भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व आष्टी येथील भगवान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. भीमराव धोंडे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, चेअरमन राजेश धोंडे, प्राचार्य दत्तात्रय वाघ व इतर उपस्थित होते उद्घाटनपर भाषणात पुढे बोलतानामाजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की, रामायण – महाभारत या अनादिकाळापासून खेळाचा उल्लेख केला जातो. खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे माणसाचे जीवन यशस्वी होते तसेच खेळामुळे जिवनाला दिशा मिळते आणि प्रगती होते. नियमित खेळ खेळल्यामुळे आहार वाढतो. माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना आवडीच्या खेळात प्रगती करावी तसेच नियमित सराव करावा. कारण की खेळात यशस्वी झाल्यामुळे नोकरीही मिळू शकते.
खेळाडूसाठी नोकरीत आरक्षण आहे. त्यामुळे जीवनात सर्वांगीण प्रगतीसाठी खेळ महत्त्वाचा आहे. मी अहमदनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना कबड्डी व कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले होते . खेळामुळेच माझी चांगली प्रगती झाल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. बीड जिल्हा हा दुष्काळी भाग आहे.
आपल्याकडे खेळाला चांगला वाव असल्याने युवकांनी चांगल्याप्रकारे खेळ खेळून आई-वडिलांचे नावलौकिक करावे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण ११ महाविद्यालये सहभागी झाले होते.
याप्रसंगी उपप्राचार्य वैद्य,प्रा. सानप, प्रा. बाळासाहेब धोंडे, प्रा. सुनील पंढरे, प्रा. जाधव, प्रा. वडगुजर, प्रा. सूर्यकांत धोंडे, प्रा. तोरडमल, प्रा. टेकाडे, प्रा. गायकवाड, पोलीस पाटील बोडखे, प्रा. नागरगोजे, प्रा. गावडे व इतर उपस्थित होते.


Discussion about this post