• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेश प्रकरणी नगरसेवक आशिष पिपरे अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निधीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीचा वापर करून प्रशासकीय मान्यतेचे खोटे पत्र तयार केल्याप्रकरणी चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याला गडचिरोली पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ४ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

काय आहे नेमके प्रकरण?

दि. २२ जून रोजी गडचिरोली जिल्हा खनिकर्म कार्यालयातील ऑपरेटर राहुल रेवाडे यांना गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक लीलाधर भरडकर यांनी प्रशासकीय मान्यतेचा पीडीएफ आदेश पाठवून संबंधित कामांना मंजुरी मिळाली आहे का, अशी विचारणा केली होती. कार्यालयाच्या नोंदी तपासल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर हे पत्र सहायक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल राठोड यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी प्राथमिक पडताळणी करून ते जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्या निदर्शनास आणून दिले. तपासात पत्रावरील लेटरहेड आणि स्वाक्षरी बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी हे प्रकरण पोलिस अधीक्षकांकडे पाठवले.

राठोड यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

छत्रपती संभाजीनगरमधून अटक

तपासादरम्यान बनावट पत्र पाठविणारा आशिष पिपरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. सोमवारी अटक दाखवून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आशिष पिपरेची पत्नी चामोर्शी नगरपंचायतीत भाजपची नगरसेविका आहे, तर पिपरे स्वतः स्वीकृत नगरसेवक आहे. यापूर्वी एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर भाजपने त्याच्यापासून अंतर ठेवले होते. त्यानंतर तो काँग्रेसच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक झाला. मात्र, त्याचे काही भाजप नेत्यांशीही संबंध कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आणखी मोठ्या नावांचा शोध

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली, आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले, मोबाईल आणि डिजिटल पुराव्यांद्वारे कोणाशी संपर्क झाला, याचा कसून तपास सुरू आहे. तपास निष्पक्षपणे पुढे गेल्यास या प्रकरणातील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे करीत आहेत.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

कांदाटी विकास संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विकास चर्चासत्र उत्साहात संपन्न

Next Post

नारळवाडीच्या शितल चव्हाण यांचा ‘सार्थी’तर्फे सन्मान

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
3
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
22
Next Post

नारळवाडीच्या शितल चव्हाण यांचा ‘सार्थी’तर्फे सन्मान

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In