
2 ऑक्टोबर रोजी सकाळी राजा शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के जाधव, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक के पी घायवट, बी जी गायकवाड, ई डी पठाण,राजन सोमासे,अनिल पाटील, वैशाली चापे,जयश्री शेजूळ, विलास मालोदे हे होते.
कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना भाषणे, गीत गायन, नाटक,मुकाभिनय व भजनी गायली व परिसर दुमदुमून टाकला. रविंद्र निकम यांनी आपले विचार व्यक्त करतांना मा गांधी यांचे जीवन, कार्य, विचार संदर्भात आपले विचार मांडले.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणामध्ये व्ही के जाधव यांनी या महान व्यक्तीच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला,स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व ते आत्मसात करण्यासाठी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुकेशनी शेगावकर व ज्ञानेश्वर
नरवडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विनोद राठोड, राजेंद्र घटकर, गणेश पाटील, नितीन जगताप,बाबासाहेब पवार,जया सरोवर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Discussion about this post