• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आषाढी वारीसाठी हरळी खुर्दची दिंडी पंढरपूरकडे रवाना; तेरवाड आश्रमशाळेत वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
93
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

आषाढी वारीनिमित्त हरळी खुर्द गावातून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे तेरवाड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा अखंड जप आणि अभंग गात हजारो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

दरवर्षीप्रमाणे हरळी खुर्द येथून निघालेली ही दिंडी तेरवाड (ता. शिरोळ) येथील ज्ञानभारती एज्युकेशन सोसायटी, कुरुंदवाड संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत सायंकाळी सुमारे ४ वाजता दाखल झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी वारकऱ्यांचे पुष्पहार व स्वागत करून त्यांचा आदरातिथ्य केला.

यावेळी वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वारकऱ्याची आस्थेने विचारपूस करत त्यांचे स्वागत केले.

संस्थेच्या सचिव सौ. माधुरी बाबासो सावगावे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या भक्तीभावाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आपण सर्वजण एवढा मोठा पायी प्रवास करत आहात, हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंगल दर्शन लाभो, सर्व मनोकामना पूर्ण होवोत. पुढील वर्षी आम्हालाही आपल्या सोबत पायी वारी करण्याची इच्छा आहे.”

या दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून देसाई गुरुजी, नाईक गुरुजी आणि परीट गुरुजी कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली वारकरी भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

चहा-नाश्त्यानंतर संस्थेच्या वतीने सर्व वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले, संतोष भुयेकर, विनोद चव्हाण, सहदेव डंबाळ, यलगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, सुनीता शिंदे, शैलजा सावगावे, वैशाली घोरपडे, रुपाली निटवे, भारती जोंग, चौगुले मॅडम, शितलकुमार घोरपडे, इरगोंडा बंडगर, छाया माने, सुनीता काडापुरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, निवासी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

पंढरपूरची वारी : केवळ यात्रा नव्हे, तर भक्ती, समता आणि संस्कृतीचा महामेळा

Next Post

पेठ–गुजरात महामार्गावरील सावळ घाटात भीषण अपघात; गुजरातमधील चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
14
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

पेठ–गुजरात महामार्गावरील सावळ घाटात भीषण अपघात; गुजरातमधील चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In