• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा तहसीलचा गाडा रुतला ! चार पैकी तीन नायब तहसीदारांची पदे रिक्त; विविध दाखले देण्यास विलंब

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

श्रीगोंदा तालुका महसूल विभागातील रिक्त पदांच्या अभूतपूर्व संकटामुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्याचा विस्तार मोठा असताना,येथील चार मंजूर नायब तहसीलदारांपैकी तब्बल तीन पदे रिक्त अनेक दिवसापासून आहेत.संपूर्ण तालुक्याचा गाडा अवघ्या एक निवासी नायब तहसीलदार आणि तहसीलदारांवर चालत असल्याने यंत्रणा कोलमडली आहे.

तहसील कार्यालयाच्या नियमानुसार ,महसूल सहाय्यक (लेखनिक ) प्रत्यक्ष फाईलवर काम करून ती संबंधित नायब तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवतात.
1 . निवासी नायब तहसीलदार
( प्रशासकीय कामे )
2 . नायब तहसीलदार संजय गांधी योजना ( निराधारांचे मानधन )
3 . नायब तहसीलदार महसूल ( जमीन व शेतीविषयक बाबी )
4 . नायब तहसीलदार निवडणूक ( मतदार याद्या व राष्ट्रीय कामे)

हे चारही अधिकारी आपापल्या विभागाच्या फाईलवर योग्य शेरा मारून ती अंतिम स्वाक्षरीसाठी तहसीलदारांकडे पाठवत असतात.पूर्वी चार अधिकारी असल्याने कामाचा निपटारा जलद गतीने होत असे. मात्र आता महसूल सहायकांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने लेखनिकांवर आधीच अतिरिक्त ताण आहे. त्यातच पुढे फेल तपासणारे तीन अधिकारीच nb असल्याने अनेक फायली टेबलवरच पडून राहतात.

वरिष्ठ कार्यालयाचा ससेमिरा आणि व्हीआयपी दौरे

उपलब्ध दोन अधिकाऱ्यांना दैनंदिन कामाव्यतिरिक्त वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या तातडीच्या माहितीचे संकलन करावे लागते. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन ,मंत्र्यांच्या आढावा बैठका आणि लोकप्रतिनिधींचा जनता दरबार या राजकीय व शासकीय सोपस्कारांमध्ये अधिकाऱ्यांचा मुख्य वेळ खर्ची पडतो.

या विस्कळीत कारभारामुळे सामान्य शेतकरी आणि विद्यार्थी यांना लागणारे विविध शासकीय दाखले वेळेवर मिळेनासे झाले आहेत. शेत जमिनीचे वाद ,रस्त्याची अडवणूक,शिव रस्ते खुले करण्याचे अर्ज महिनोन्महिने प्रलंबित आहेत. न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेले नागरिक तहसील कार्यालयावर मोर्चे आणि आंदोलने धडकावत आहेत .ही आंदोलने आणि कायदा सुव्यस्था हाताळताना अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. यामुळे मूळ प्रशासकीय कामे करण्यासाठी वेळच उरत नाही असे निरीक्षण केले असता लक्षात येते.

यंत्रणा हतबल ; कर्मचारी जनतेच्या रोषाला सामोरे !
महसूल सहाय्यक आणि उपलब्ध अधिकारी रात्रीचा दिवस करून काम करीत असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा डोंगर उपसने अवघड झाले आहे. कामे रखडत असल्याने रोज कार्यालयात येणाऱ्या संतप्त जनतेच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ महसूल कार्यालयाने श्रीगोंद्याची ही कोंडी फोडण्यासाठी तातडीने पूर्णवेळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी ,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

गडमुडशिंगी येथील सौ. पल्लवी देसाई घरून बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांचे नागरिकांना आवाहनाचे वृत्त

Next Post

शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कलावंत मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कलावंत मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न!

शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कलावंत मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In