• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पारंपरिक नृत्यांनी संस्कृतीचा जागर
पद्मश्री पुरस्कारप्राप्त आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांच्या प्रतिकृती तसेच हिरवा देवाची पालखी ठरली आकर्षण; ढोल, तारपा, गौरी, तुर नृत्याने जव्हार दुमदुमले

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

पालघर : सौरभ कामडी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार शहरात रविवारी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडविणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. युवा आदिवासी संघच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, तारपा, मादोल, संबळ यांसह विविध आदिवासी नृत्यांनी शहरातील वातावरण जल्लोषमय झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री पुरस्कारप्राप्त आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांच्या प्रतिकृती मिरवणुकीत समावेश करण्यात आला. तसेच आदिवासी समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या हिरवा देवाच्या पालखीने मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ हा संदेश देत पारंपरिक कला, बोलीभाषा, वेशभूषा आणि लोकवाद्यांचे दर्शन या माध्यमातून घडविण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त युवा आदिवासी संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरात आदिवासी बांधवांची गर्दी होऊ लागली होती. त्यानंतर चौक-मांगेलवाडा, अंबिका चौक, गांधी चौक, अर्बन बँक-पाचबत्ती चौक, यशवंतनगर, मोर्चा-गोरवाडी मार्गे आदिवासी क्रांतिकारक चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत तारपा नृत्य, ढोल नृत्य, गौरी नाच, मादोल नाच, मोरघा नृत्य, तुर नाच, गवत्या नाच, संबळ आदी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आदिवासी गीतांसह डीजेच्या तालावरही तरुणाईने ठेका धरला.

सर्वपक्षीय सहभाग
या कार्यक्रमाला आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष कुणाल सापटा, महिला अध्यक्ष संजना बुदर, महिला कार्याध्यक्ष हेमा राऊत, कार्याध्यक्ष जितेश भोये, सचिव नरेश कुवरा, खजिनदार राहुल घेगड, सर्व आदिवासी समाज सल्लागार यांच्यासह संघटनेचे आजी-माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष सुरेखा थेतले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब विनायक राऊत, दिलीप पाटेकर शबरी महामंडळ संचालक, माजी सभापती ज्योती भोये, माजी सभापती विजया लाहारे, जव्हार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा, तालुक्यातील सरपंच-उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश मिळाला.

पोलिसांचे सहकार्य
मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार, डीवायएसपी भारत मेहेर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊनही मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली.
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि लोकजीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ या भावनेतून जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Tags: Saurabh Kamdi
Previous Post

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

Next Post

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 16, 2026
33
Next Post
परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In