करमाळा प्रतिनिधी : बाहेर तालीम तरुण मंडळ, भवानी पेठ, करमाळा यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याच्या अभियान २०२६’ अंतर्गत शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर छत्रपती चौक, भवानी नाका, करमाळा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन तसेच औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी डॉ. अनिल होटकर, डॉ. अविनाश घोलप, डॉ. पोपटराव नेटके, डॉ. जयंत कापडी, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. बालाजी कटके, डॉ. रोहन पाटील, डॉ. विशाल शेटे, डॉ. संतोष शेलार, डॉ. शैलेश देवकर, डॉ. राम बिनवडे, डॉ. मनोज काळे, डॉ. महेश भोसले, डॉ. अनुप खोसे, डॉ. विनोद गादिया, डॉ. उमेश जाधव, डॉ. राजेश दोशी आणि डॉ. हितेश मेहेर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाहेर तालीम तरुण मंडळ, भवानी पेठ, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




