भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मधील उच्च माध्यमिक विभागात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री जी एस साळुंखे सरांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वासाजी चितळे होते. त्यांनी आपल्या मनोगतात साळुंखे सरांच्या शैक्षणिक कार्या बरोबरच सामाजिक कार्याचाही उल्लेख केला. त्यांच्या सारखे खडतर परिश्रम सर्वांनी केले तर यशाच्या शिखरावर पोहचू शकता असे विचार मांडले.
शिक्षक मनोगतामध्ये उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक श्री कुकडे सरांनी साळुंखे सरांचे सर्व शिक्षकाशी सलोख्याचे संबंध होते विभाग प्रमुख म्हणून सर्वांकडून अधिकारवाणीने काम करून न घेता प्रेमळ बोलण्यातून काम करून घेण्याचे कसब सर्वांनी शिकण्यासारखे आहे हे सांगितले. साळुंके सरांनी आपला मनोगतात आपल्या सर्व शैक्षणिक प्रवासाचा धावता आढावा घेतला. संस्थेच्या सर्व आजी माजी कार्यकारणी मंडळाचे, विद्यालयातील आजी माजी सर्व शिक्षकांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखे असते ते शिकत गेलो व मी यशस्वी झालो हे विनम्रपणे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संस्थेचे सचिव श्री मानसिंग हाके सरांनी केले त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून साळुंखे सरांच्या कार्याचा गुणगौरव केला. संस्थेने साळुंखे सरांना मानपत्र सन्मानाने प्रदान केले. त्या मानपत्राचे वाचन संस्थेचे सहसचिव के डी पाटील सरांनी केले. विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने साळुंखे सरांना चांदीची गणेश मूर्ती समारंभ पूर्वक मुख्याध्यापकांच्या हस्ते भेट देण्यात आली. साळुंखे सरांनी संस्थेच्या शाळेच्या प्रगतीच्या वाटेत खारीचा वाटा म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वासजी चितळे यांच्याकडे सुपूर्त केला तर शालेय कामकाजासाठी प्रिंटर मुख्याध्यापक श्री मोरे सरांच्याकडे सुपूर्त केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. भोये सरांनी केले. आभार प्रदर्शनात विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री मोरे सरांनी सरांच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करून त्यांचे व त्यांच्या कुटुंब यांचे आभार व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी आवर्जून संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, संस्थेचे सर्व आजी-माजी संचालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






