शिवदास तात्या थळकरी यांचा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम; दिंडीतील वारकरी व ग्रामस्थांकडून कौतुक
केज | प्रतिनिधी
ह.भ.प. बोराडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे पायी जाणारी दिंडी दरवर्षीप्रमाणे यंदाही सोनीजवळा येथील शिवदास तात्या थळकरी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी थांबली होती. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या कु. भाग्यश्री गोविंद ससाणे (MBBS), कु. मंजिरी वैजनाथ थळकरी (MBBS) आणि शिवशंकर रामेश्वर थळकरी (MBBS) यांचा तसेच महसूल सहाय्यकपदी कार्यरत असलेल्या कु. स्नेहा श्रीकृष्ण थळकरी यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष शिवदास तात्या थळकरी, उमाकांत अण्णा डोंगरे, वैजनाथ थळकरी, कैलास पाटील, सुहास गुजर, शंकर इंगळे, शिवहार थळकरी, उपसरपंच हनुमंत पाटील, शहाजी शिंदे, महेश थळकरी, ॲड. हनुमान जाधव, जनक राऊत, दत्ता देशमाने, अविनाश ससाणे, मनोज कदम, सोनीजवळा ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद ससाणे, मिनाज पठाण, सचिन मुळे, अजय काळे यांच्यासह दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठे यश संपादन करावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या यशाचा समाजासमोर गौरव व्हावा, या उद्देशाने शिवदास तात्या थळकरी दरवर्षी दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करतात.
त्यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, अशा सत्कारांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळते, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.











