• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

हजारो पनवेलकरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

पनवेल|प्रतिनिधी |श्रीनाथ(गणेश) लाड|
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य ‘तिरंगा पदयात्रे’चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी, पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेचे नेतृत्व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पावसाची संततधार सुरू असतानाही देशभक्तीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. हातात तिरंगा ध्वज घेऊन युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण पनवेल शहर दुमदुमून गेले.

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथून तिरंगा पदयात्रेला उत्साहात सुरुवात झाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळून टपाल नाका, मिरची गल्लीमार्गे पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे देशभक्तीच्या उत्साहात पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
पदयात्रेच्या संपूर्ण मार्गावर तिरंग्याचे रंग, देशभक्तीपर घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे पनवेल शहराला जणू राष्ट्रभक्तीच्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पदयात्रेदरम्यान पावसाची संततधार सुरू होती. मात्र, प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता नागरिकांनी पावसाच्या सरी अंगावर झेलत तिरंगा हातात घेऊन पदयात्रेत सहभाग नोंदविला. पाऊस आणि देशप्रेमाची जिद्द यांचा अनोखा संगम या पदयात्रेत अनुभवायला मिळाला.
विशेषतः युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विविध शाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.

तिरंगा हा भारताच्या सार्वभौमत्वाचा, स्वाभिमानाचा, एकता आणि अखंडतेचा प्रतीक आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे, हा या पदयात्रेचा प्रमुख उद्देश होता.
देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत करावी आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असा ‘देश प्रथम’चा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या तिरंगा पदयात्रेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जयंत पगडे, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, मधू पाटील, अजय बहिरा, रवी जोशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, मयुरेश नेतकर, वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रभुदास भोईर, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत यांच्यासह नगरसेवक, माजी सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या भव्य तिरंगा पदयात्रेमुळे पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला विशेष रंगत आली. तिरंग्याचा सन्मान, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

Previous Post

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास तुर्तास स्थगिती:

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास तुर्तास स्थगिती:

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In