
कुणी केव्हा व कुठे जन्माला यावं हे कोणीच ठरवू शकत नाही; तो संपूर्ण अधिकार निसर्ग आणि नियतीचा आहे. परंतु बुद्धी, युक्ति व शक्तीच्या सामर्थ्याने अनुराधाताई स्वतःला सिद्ध करू पाहतात. पुरुषार्थ हा फक्त पुरुषच गाजवू शकतात, असे नाही; तर स्त्री देखील कर्तुत्वाने पुरुषार्थाची मानकरी ठरते. त्या आपल्या प्रयत्न, जिद्द, धैर्य व आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचा पुरुषार्थ साध्य करत आहेत. प्रथमतः त्यांच्या या पराक्रमास सादर प्रणाम.
इतिहासात पाहिलं तर एक महिला देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री म्हणूनच नाही, तर विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अध्यात्मिक सर्व क्षेत्रात महिलांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्याला मुलगी, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, प्राध्यापिका, पत्रकार, समाजसेविका, व्यावसायिक अशा बहुसंख्य स्वरूपात पाहावयास मिळतात. मग एक स्त्री तिच्या कर्तुत्वावर आमदार झालेली दिसली तर नवल वाटायला नको.
आपल्या संस्कृतीमध्ये पुरुषांचे चार प्रकारचे कर्तव्य आहेत: धर्म, अर्थ, काम व मोक्ष. अनुराधाताई सत्याच्या मार्गावर, न्यायनीतीच्या मार्गावर धर्माचे अनुकरण करतात. त्या धन, सत्य व उत्तम मार्गानेच मिळवतात. हाच अर्थ होय. मर्यादा राखून सुख, समाधानी जीवन समाजासाठी व्यथित करतात; हाच काम होय.
कैलासवासी बापूंचा विचार घेऊन समाधानाने समाजासाठी जगणं व मरण हाच तो काय मोक्ष. मग एखादी स्त्री आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगत असेल तर तथाकथित राजकीय पुरुषांनी राजकीय अहंकार जागा करू नये, कारण त्या संपूर्ण स्त्री वर्गातच प्रतिनिधित्व करतात. असं काही नाही तर त्यांच्या रूपाने तालुक्याला एक महिला आमदार होणार असेल, तर हाच खऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान ठरावा.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते; त्याचप्रमाणे एका यशस्वी स्त्री मागे सन्माननीय राजेंद्र दादा, पती म्हणून उभे राहिले तर काय बिघडते? ही विधानसभेची लढाई स्त्री-पुरुष भेदाची नसून स्त्री शक्ती विरुद्ध पुरुषी अहंकार ठरू नये, एवढीच माफक अपेक्षा. शेवटी विजय हा कोणाचा होतो, हे आपणास ज्ञातच आहे.
Discussion about this post