धानवड : प्रतिनिधी
धानवड येथील जि. प. मराठी शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जि. प. मराठी शाळेतील ध्वजारोहणाचा मान श्री. चंदू दादा पाटील व विलास संतोष पाटील यांना देण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान श्री. संभाजी बाबू पवार व दिलीप दादा पाटील यांना देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज भाऊ, सरपंच संभाजी पवार, उपसरपंच हारिलाल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप माणके, विजू राठोड, महेश माणके, कैलास अहिरे, पोलीस पाटील कैलास माणके, गोलू बाविस्कर तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी आणि युवा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडला.










