लोहारा तालुका प्रतिनिधी । आदित्य अरुण जाधव.
लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील मुलींच्या व मुलांच्या वस्तीगृहासमोरील खुल्या मैदानात महाराष्ट्र शासन व धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः आपल्या नावाचे एक एक वृक्ष लावून ते जोपसण्यासाठी दत्तक ही घेतले. ‘एक पेड देश के नाम’ झाडे लावा, ती जोपासा, त्यांचे संवर्धन करा असा संदेश आजच्या वृक्षारोपणातून विद्यार्थी व समाजाला जिजाऊ प्रशासकीय महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आला. यावेळी प्रा. रमेश गिराम, प्रा.सौ. प्रियांका जमादार, प्रा. प्राजक्ता लकडे, वैष्णवी लोहार, सौ. राणी माटे आदि प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.











