‘सारथी महाराष्ट्राचा’
जि.प्रतिनीधी:डॉ.पंजाबराव खाडे.
जनतेचा प्रशासनाला,सरकारला प्रश्न.!
अकोला येथील ‘मेन हॉस्पिटल’ (Main Hospital – ज्याला आता सर्वोपचार रुग्णालय म्हणून ओळखले जाते) ची स्थापना सन १९२७ मध्ये झाली. सुरुवातीला हे केवळ ५० बेडचे एक लहान रुग्णालय होते.या रुग्णालयाच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत
-सुरुवात (१९२७): अकोला जिल्ह्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल’ किंवा ‘मेन हॉस्पिटल’ म्हणून ब्रिटीश काळात याची स्थापना करण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालयाची जोड (२००२-२००३): सन २००२ मध्ये शासनाने येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Akola) मंजूर केले, आणि २००३ मध्ये महाविद्यालय सुरू झाल्यानंतर हे मेन हॉस्पिटल त्याचे अधिकृत अध्यापन रुग्णालय (Teaching Hospital) बनले. त्यानंतर याचे नाव ‘सर्वोपचार रुग्णालय’ करण्यात आले.विस्तार (२०२२): याच रुग्णालय परिसरात रुग्णांच्या प्रगत उपचारांसाठी १५० कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Super Speciality Hospital) ची इमारत उभारण्यात आली, जी २०२२ मध्ये सुरू झाली.
सध्या हे रुग्णालय २५ एकर परिसरात पसरलेले असून येथे सुमारे ६८० पेक्षा जास्त बेडची क्षमता उपलब्ध आहे.
परंतू आज महीला वार्ड बरोबरच ईतर नविण बांधकाम चालु केल्या मुळे जुन्या कार्यास न्याय मिळणे अपेक्षित असत.परंतु नविण बांधकाम व ईतर गोष्टी पुढे करुण जनतेचे हाल करणे हे कितपत योग्य आहे.
आज रुग्णालयाची
परिस्थिती अत्यंत भयावह असुंन एकाच बेडवर दोन रुग्ण म्हणजे त्यांचे जीवाशी खेळणे नव्हे का्?
मा.आरोग्यमंत्री,मा.जिल्हाधिकारी,मा.डीन या गोष्टी कडे जातीनिशी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.






