• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी-

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
आमदार सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ग्रामीण भागातील युवकांचा शिवसेनेकडे वाढता कल

पाथरी : पाथरी व मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमधील युवक, कार्यकर्ते व नागरिकांनी आमदार सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. याच कार्यक्रमात विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना आमदार सईद खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

युवा सेना जिल्हाप्रमुख पवन डुकरे यांच्या संघटनात्मक कार्यशैलीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून यश मिळाले असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात असल्याचे यावेळी दिसून आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा सेना जिल्हाप्रमुख पवन डुकरे यांनी केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अनंतराव वाकणकर तसेच नगरसेवक गोविंद हरकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आमदार सईद खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पक्षप्रवेश करणाऱ्या नव्या सहकाऱ्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा रुमाल घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार सईद खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनियुक्त पदाधिकारी

– मुकेश श्रावणे — युवा सेना उपजिल्हाप्रमुख, ओबीसी सेल
– सोमेश्वर श्रावणे — युवा सेना तालुकाप्रमुख, पाथरी, ओबीसी सेल
– संतोष कोरडे — युवा सेना तालुकाप्रमुख, मानवत
– अमोल घाटूळ — युवा सेना तालुका संघटक, मानवत
– श्याम डुकरे — युवा सेना उपतालुकाप्रमुख, पाथरी

कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते टाकळकर नाना, बाळूकाका, पत्रकार एल. आर. कदम, प्रमोद नवले,वैजनाथ कोल्हे, कृष्णा डुकरे,यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच पाथरी व मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या हजारो शिवसैनिकांची उपस्थिती कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.

यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख खुर्शिद शेख यांनी केले.

“गावागावांत संघटन मजबूत, युवकांचा शिवसेनेकडे वाढता ओघ आणि आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता जनाधार” असा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

Ad 1
Previous Post

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

Next Post

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
26
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
11
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
36
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In