• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश; ११५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
मानवत येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश; ११५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

मानवत / प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

जात, धर्म, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेद न करता प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि आनंदात सामील होणे, हीच मानवतेची खरी ओळख आहे. समाजात सलोखा, शांतता आणि सहअस्तित्व टिकवण्यासाठी मानवता धर्माचा स्वीकार करणे हीच खरी धर्मनिष्ठा असल्याची शिकवण प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिली. याच मानवतेच्या संदेशाला अनुसरून जमात-ए-इस्लामी हिंदच्या युवा संघटना मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, शाखा मानवत यांच्या वतीने प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शुक्रवारी (दि. २८) पेठ मोहल्ला परिसरातील मरकस मस्जिद येथे सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे अध्यक्षपद शेख समीर यांनी भूषविले.

या शिबिराला मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, मानवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक शेख आशिक हुसेन, पोलीस कर्मचारी अनिस कौसडीकर, सय्यद उमर, नगर अभियंता सय्यद अन्वर, नगरसेवक तसेच पाथरी येथील समाजसेवक गुलशेर खान, नियामत खान, मोहम्मद बिलाल बागवान आदींनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आहात बेलदार, सरफराज सय्यद, सलीम सर बागवान, सय्यद इकबाल सिद्दीक बागवान, अरबाज बेलदार, कलीम खान यांनी परिश्रम घेतले. तसेच परभणी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे पंढरीनाथ ठाकूर, कल्पना खंदारे, आकाश बगाटे, एजाज अन्सारी, रामा ढगळे, कपिल भरड, हमीद सिद्दिकी, रोमान शेख आदी उपस्थित होते.

नजात पठाण यांची प्रतिक्रिया

“प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मानवतेची, बंधुभावाची आणि गरजूंच्या मदतीची शिकवण दिली. त्याच विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. रक्तदानातून एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांना समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे.

या शिबिराला प्रत्यक्ष भेट देऊन प्रोत्साहन देणारे मान्यवर, रक्तदाते, परभणी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यातही मानवतेच्या सेवेसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील,” अशी प्रतिक्रिया नजात पठाण सर यांनी दिली.

Ad 1
Previous Post

युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In