विहिरगांव प्रतिनिधी – रजत चांदेकरदिनांक 1//10/2024रोजी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत कोतवालाचे मानधन 10%नी वाढविण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना राळेगाव च्या वतीने मा. तहसीलदार राळेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन निषेध नोंदविण्यात आलेला आहेकोतवाल हा वर्ग 3व वर्ग 4ची कामे 15000हजार चा अल्प मानधनावर काम करीत असतो नैसर्गिक आपत्ती,
निवडणूक सारख्या महत्वाचे कामामध्ये 24तास इमानदारीने काम करून सुद्धा शासनाने 15000रुपयाची वाढ करून कोतवालाची एकप्रकारे थट्टा केली आहेहा कोतवालाचा अपमान आहे
कोतवाल संघटनेने कधीच मानधन वाढीची मागणी केली नाहीत्यांनी शासनाच्या फक्त चतुर्थ श्रेणी ची मागणी केली होती तरी 10%वाढ दिला याचा संपूर्ण राज्यात कोतवाल संघटनेकडून निषेध करण्यात येत आहेत्यावेळी जिल्हा अध्यक्ष महिला छाया दरोडे,तालुका अध्यक्ष रूपेश पेचे,उप अध्यक्ष मीनाबाई कुळसंगे,दिपक खिरटकर,मनोज आत्राम,पवन केरोदे,अमित बेताल,मयुरी कुडमते,सोनाली चांदेकरआदी सदस्य उपस्तित होते
Discussion about this post