दिपक गजभारे घुंगराळेकर…अधिकारी आणि गुतेदाराच्या संगणमताने नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागात रस्त्यांची कामे बोगस व निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या अंदाजपत्रकात अनेक महत्त्वाच्या तरतुदी ठेवण्यात आल्या मात्र एकही गुत्तेदार अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार काम करत नाही.
टक्केवारीच्या ओझ्याखाली दबलेले अधिकारी तोंडावर बोट व कानावर हात ठेवून बसले आहेत याचा फटका नागरिकांना बसत असल्याने या कामांची गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागात एकाच नेत्याची दादागिरी सुरु असून अधिकारी या नेत्याच्या दावणीला बांधले असल्यासारखे वावरत आहेत. रस्ते कामाचे अंदापत्रक तयार करतांना अनेक मोठ्या तरतुदी ठेवण्यात येत आहे पण काम करतांना अंदाजपत्रकातील मानकानुसार कामे करण्यात येत नाहीत. कुणी तक्रार केली तरच त्या कामावर अधिकारी जातात आणि चौकशी करण्याचा फार्स करतात.
मागच्या चार वर्षात नायगाव तालुक्यात १०० किलोमीटर रस्ते झाले असतील यासाठी जवळपास २०० कोटीचा खर्चही झाला आहे पण यातील एकाही रस्त्याची गुणवत्ता अंदाजपत्रकातील मानकानुसार नाही. विशेषतः नायगाव उपविभागात वार्षिक दुरुस्ती करणे आणि नळकांडी पुलाची कामे दरवर्षी केल्या जातात. या कामातून केवळ अधिकारी आणि गुत्तेदारांना पोसण्याचे काम होत आहे.
दरवर्षी वार्षिक दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाची कामे हाती घेतली जातात पण ती कामे कुठे होतात हे कुणालाच कळत नाहीत. दुसरीकडे याच रस्त्यावर सुधारणेचे काम करण्यात येते. नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रस्ता १० कि.मी. खर्च १३ कोटी, शेळगाव छत्री-सुजलेगाव-औराळा-कोठाळा १० कि.मी. खर्च १५ कोटी, नायगाव बेंद्री माजंरम ५ कि.मी. खर्च ६ कोटी, कुंटूर फाटा ते कुंटूर ८ कि.मी. खर्च ८ कोटी, कहाळा फाटा ते पाटोदा बरबडा अंतरगाव १२.५ कि.मी खर्च १६ कोटी आणि हुस्सा ते राहेर ६ कि.मी. खर्च ७.८० कोटी असा जवळपास वरील सर्व कामासाठी जवळपास ६६ कोटींचा खर्च झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होवूनही या सर्व रस्त्यांची केवळ सहा महिण्यातच बकाल अवस्था झाली आहे.
झालेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष केल्याने संबधीत गुत्तेदार अतिशय सुमार दर्जाचे व बोगस कामे केली आहेत.
या सर्व बोगस व सुमार दर्जाच्या कामाला नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपभियंता बारसकर व देगलूरचे कार्यकारी अभियंता कोटलवार हे पाठबळ देत असल्याचा आरोप करुन वरील कामाची चौकशी गुणनियंत्रण पथकाकडून करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुशकुमार देगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागच्या मुख्य अभियंत्यासह गुणनियंत्रण विभागाचे अधिक्षक अभियंता व नांदेड विभागाचे मंडळ अधिक्षकाकडे तक्रार केली आहे.
———–दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता गणेश बारसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.व केव्हा केव्हा फोन उचलत सुध्दा नाहीत………..
Discussion about this post