• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवले; २४ तासांत पुन्हा ठोकल्या बेड्या
0
SHARES
160
VIEWS
Ad 1
Ad 1

दोन राज्यांच्या पोलिसांची संयुक्त शोधमोहीम; चिखली परिसरात कडक बंदोबस्त

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

प्रतिनिधी: शेख मोईन

किनवट:किनवट येथून रविवारी ३० ऑगस्ट रात्री तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातून जमावाने हल्ला करून पळवून नेलेल्या आरोपीला अखेर चिखली परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात पसरलेला तणाव निवळण्यास मदत झाली आहे.
तेलंगणातील बाजार हातनूर पोलिसांच्या गुन्ह्यात मागील १० महिन्यांपासून गुंगारा देणारा आरोपी शेख जाफर उर्फ बाखर शेख आदम वय ४५ रा. चिखली याला रविवारी सायंकाळी तेलंगणा पोलिसांच्या पथकाने किनवट येथील करम हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले होते. नियमानुसार किनवट पोलीस ठाण्यात नोंद करून तेलंगणाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश परशुराम गोकाला व त्यांचे कर्मचारी आरोपीला वाहनाने घेऊन जात होते.
दरम्यान, गोकुळनगर परिसरातील चिखली फाट्याजवळ आरोपीच्या नातेवाईकांनी व साथीदारांनी पोलिसांचे वाहन अडवून जोरदार हल्ला चढवला. पोलिसांशी झटापट करत जमावाने आरोपीला हातकडीसह पळवून नेले. स्वतःच्या बचावासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी हवेत एक राऊंड गोळीबार केला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून भोकर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवली. तसेच आदिलाबाद आणि निर्मल येथूनही तेलंगणा पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता.
दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी चिखली व आसपासच्या परिसरात संयुक्त शोधमोहीम राबवून पसार झालेला आरोपी शेख बकर याला सोमवारी ३१ ऑगस्ट दुपारी पुन्हा बेड्या ठोकल्याया कारवाईनंतर आरोपीची पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी रवानगी करण्यात येत असून त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिखली गावात सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

Ad 1
Previous Post

*पावसाचा खंड अन् बळिराजा चिंतेत; मालेगाव परिसरात पिके पाण्याविना संकटात, बाजारपेठेतही मंदीचे सावट

Next Post

विषय : प्रतिनिधी पदाचा राजीनामा व कार्यसंबंध समाप्त करण्याबाबत.

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
1
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
1
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
10
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
1
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
0
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
0
Next Post

विषय : प्रतिनिधी पदाचा राजीनामा व कार्यसंबंध समाप्त करण्याबाबत.

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In