• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

Pratik Tidke by Pratik Tidke
September 2, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

सौ. सविता विकास तळेकर यांचे आवाहन; जिल्हा परिषद व आमदार तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून स्थानिक प्रश्न सोडविणार
वाशी तालुका प्रतीनीधीराजेंद्र आहिरे : पारगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांनी केले आहे.
बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पारगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रभाग समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

या बैठकीमध्ये पारगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधील रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, अंगणवाडी, स्वच्छता, नाली, पथदिवे, सामाजिक सुविधा तसेच इतर प्रलंबित विकासकामांबाबत नागरिकांकडून प्रश्न व मागण्या जाणून घेण्यात येणार आहेत.
स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच आवश्यक विकासकामांसाठी जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमातून तसेच मतदारसंघाचे आमदार मा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन स्थानिक नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती सौ. सविता विकास तळेकर यांनी दिली.
गावाच्या विकासासाठी केवळ प्रशासनाची यंत्रणा नव्हे, तर नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या गावातील प्रलंबित प्रश्न, आवश्यक विकासकामे आणि मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्या बैठकीत मांडाव्यात. नागरिकांच्या मागण्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून संबंधित विभागांकडून कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

“पारगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले प्रश्न मांडावेत. जिल्हा परिषद धाराशिव तसेच मतदारसंघाचे आमदार मा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू,” असे आवाहन सौ. सविता विकास तळेकर यांनी केले.

Ad 1
Previous Post

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

Next Post

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
2
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
5
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
15
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
1
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
3
Next Post
पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In