• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरण, दि. १० (विठ्ठल ममताबादे) द्रोणागिरी उरण येथे असलेल्या एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने फायर अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आग लागण्याची कारणे, संभाव्य धोके तसेच आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

RelatedPosts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन अधिकारी अमित कांबळी आणि लिडिंग फायरमेन सागर साळुंके यांनी विद्यार्थ्यांना आग कशी व कुठे लागू शकते, आगीची प्रमुख कारणे कोणती, आग लागल्यास घाबरून न जाता कोणत्या उपाययोजना कराव्यात, तसेच आग विझविण्याच्या विविध पद्धती याबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत आग प्रतिबंधक उपायांची माहिती देण्यात आली.
आगीची दुर्घटना घडल्यास स्वतःचा बचाव करताना इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी कशी घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या सल्लागार स्वातीताई म्हात्रे, मुख्याध्यापिका मृदुला धोंडी,सहसचिव किरण घरत, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील, महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सूर्यकांत ठाकूर, जेएनपीटीचे कर्मचारी संदीप पाटील तसेच स्कुलचे सर्व शिक्षक, कर्मचारीवर्ग आणि पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आगीच्या प्रसंगी घ्यावयाच्या खबरदारीची तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अधिक प्रभावीपणे माहिती मिळाली.
दरम्यान, कोणत्याही ठिकाणी आग लागल्यास नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाशी 8104961941 किंवा 022-69365600 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले.

Previous Post

कडूबा मस्के यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

Next Post

परमेश्वर सातपुते यांची शिवसेना उ बा ठा लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

Related Posts

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा
Blog

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026
0
Blog

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026
1
Blog

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026
0
प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!
Blog

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

September 12, 2026
0
पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत
Blog

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत

September 12, 2026
1
जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप
Blog

जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप

September 12, 2026
2
Next Post

परमेश्वर सातपुते यांची शिवसेना उ बा ठा लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

वाघेश्वर विद्याधाममध्ये भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

September 12, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In