समय सारथी
बाजीराव चौरे:-
गोरे दत्ता
लातूर प्रतिनिधी दि.११
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ मधून प्रसिद्ध झालेल्या अधिकृत नियुक्तीनुसार हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे माजी बीड जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांची लातूर जिल्हा संपर्कप्रमुख कार्यक्षेत्र – लातूर लोकसभा मतदारसंघ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे परमेश्वर सातपुते सर यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा तळागाळातील जनतेशी जोडलेला राहिला आहे. शिवसेनेमध्ये शाखाप्रमुख किसान सेना जिल्हाप्रमुख आणि शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी भूषविल्या आहेत यासोबतच जनतेमधून काम करताना गावचे सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे पक्षसंघटना ग्रामविकास शेतकरी सहकार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा त्यांना दांडगा अनुभव आहे
शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने उभारणे प्रशासनाला निवेदने देणे शेतकऱ्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी त्यांच्या बांधावर पोहोचणे तसेच संकटाच्या काळात गरजू शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय मुद्दा म्हणून न पाहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीही सातपुते सर यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.समाजातील वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळावा त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यामुळे जनतेमध्ये केवळ राजकीय पदाधिकारी म्हणून नव्हे तर संकटाच्या काळात धावून जाणारा आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी उभा राहणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातपुते सर शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत तळागाळातील शिवसैनिक पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये उपक्रमांमध्ये आणि सामाजिक प्रश्नांवरील संघर्षात सक्रिय भूमिका बजावली आहे प्रभावी वक्तृत्व संघटन कौशल्य आक्रमक व अभ्यासपूर्ण भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविण्याची भूमिका यामुळे त्यांनी पक्षात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे बीड जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी ग्रामीण भागातील शिवसैनिकांना संघटित करण्यासोबतच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले
त्यांच्या दीर्घकाळच्या कार्याची आणि संघटनात्मक अनुभवाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी आता त्यांच्यावर लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे नवीन पदाधिकारी व शिवसैनिकांना पक्षाशी जोडणे तळागाळातील संघटन अधिक मजबूत करणे तसेच पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली व्यापक संघटनात्मक कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुका होणार असल्याने सातपुते सर यांची लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची मानली जात आहे त्यांच्या संघटन कौशल्यासोबतच शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये केलेल्या प्रदीर्घ कामाचा लातूर जिल्ह्यातील पक्षबांधणीसाठी मोठा फायदा होणार असल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे
लातूर जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकविण्यासाठी संघटन विस्ताराला प्राधान्य देत सातपुते सर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला नवी दिशा नवा जोम आणि नवी गती मिळेल अशी शिवसैनिकांमध्ये भावना आहे..!.






