रयत संकुलाच्या वतीने आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
श्रीगोंदा : प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी दिली.
समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बबनरावजी पाचपुते अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते, महावीर पटवा, अण्णासाहेब शेलार, शिवाजीराव पाचपुते, सुभाषशेठ गांधी, कुंडलीकराव दरेकर, नवनाथ बोडखे, रविशेठ दंडनाईक, जयश्री दरेकर, रत्नप्रभा बोरुडे, ज्योत्स्ना भंडारी, संजय मचे, गणेश भोस, नगराध्यक्ष सुनिताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच रयत संकुलातील सर्व शाखाप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांचीही या समारंभाला उपस्थिती राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी सांगितले.











