• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुडावद येथील पादचारी पुलाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सहा वर्षांपासून रखडलेले काम; भूमी अभिलेख व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची मोजणी पूर्ण

सोनगीर, ता. २६ (प्रतिनिधी) :
मुडावद (ता. शिंदखेडा) येथील तापी-पांझरा संगमावरील कपिलेश्वर मंदिराला जोडणारा सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचा पादचारी पूल गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. याबाबत दैनिक सकाळने ३० जून रोजी आवाज उठवल्यानंतर भूमी अभिलेख विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या पायऱ्या आणि पोहोच रस्त्यासाठी आवश्यक जागेची अधिकृत मोजणी पूर्ण केली आहे. त्यामुळे पुलाचे उर्वरित काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RelatedPosts

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

हिंगणघाटमध्ये ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची तोड; कारवाईची मागणी

निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात

पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने भाविकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पुलाचा पोहोच रस्ता खासगी शेतजमिनीमधून जात असल्याने जमीन संपादन करून योग्य मोबदला दिल्याशिवाय रस्ता देण्यास संबंधित शेतकऱ्याने नकार दिल्याने काम रखडले होते.

सध्या पुलावर जाण्यासाठी तात्पुरत्या पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र या पायऱ्यांचा लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नथू धनगर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आता प्रत्यक्ष मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

भूमी अभिलेख शिंदखेडा विभागाचे भूमापक ओम पवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक संजय माळी, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास वाकडे, दगडू निळे आणि शेतकरी मंगेश कोळी उपस्थित होते.

Tags: Rahul Thakre
Previous Post

निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात

Next Post

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

Related Posts

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
ताज्या घडामोडी

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026
1
हिंगणघाटमध्ये ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची तोड; कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमध्ये ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची तोड; कारवाईची मागणी

September 27, 2026
2
निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात
ताज्या घडामोडी

निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात

September 27, 2026
5
शहापूरचे धार्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्त्व स्व. काशिनाथ भगवान गिरी यांचे सर्पदंशाने निधन
ताज्या घडामोडी

शहापूरचे धार्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्त्व स्व. काशिनाथ भगवान गिरी यांचे सर्पदंशाने निधन

September 27, 2026
13
शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन
ताज्या घडामोडी

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
0
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
7
Next Post
निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

ताज्या बातम्या

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

September 27, 2026
मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

September 27, 2026
नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In