पालखीची ग्रामप्रदक्षिणा; प्रवचन, आरती, जप व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण
इंदापूर प्रतिनिधी :
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. स्वामीभक्त महिलांनी रांगोळी काढून पालखीचे उत्साहात स्वागत केले.
पालखी दत्त मंदिरात पोहोचल्यानंतर ह.भ.प. प्राचार्य मधुकर कोथमिरे (बारामती) यांचे प्रवचन झाले. यावेळी स्वामीभक्त महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व जप करण्यात आला.
यावेळी श्री. सचिन पांडुरंग रणवरे (मेजर) यांच्या वतीने स्वामीभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पालखीची सजावट श्री. राजेंद्र मारुती घोडे यांनी, तर मंदिरातील रांगोळीची सेवा सौ. शीतल सुनील टकले यांनी केली. वालचंदनगर येथील स्वामीभक्त श्रीराम कुंभार सर व त्यांच्या सहकाऱ्यांचीही विशेष उपस्थिती होती.









