गणेश मंडळांच्या मिरवणुकीत विविध समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; सैय्यद जहांगीर यांनी दिल्या शुभेच्छा
बार्शीटाकळी, जि. अकोला :
बार्शीटाकळी शहरात गणेशोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत विविध समाजबांधवांनी उत्साहाने सहभागी होत परस्परांच्या सणांचा आदर आणि बंधुभावाचा संदेश दिला.
यावेळी अकोला जिल्हा शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख सैय्यद जहांगीर यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दाखविलेला सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराचे वातावरण हे बार्शीटाकळी शहरातील बंधुभावाचे उदाहरण ठरले.







