• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

नवीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा; बसफेऱ्या आणि मुक्काम सुरू ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न

सातारा : सातारा बसस्थानकाच्या नूतनीकरणातील महत्त्वाचा टप्पा अखेर गाठला जाणार आहे. नवीन इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणारी जुनी इमारत २७ ऑक्टोबरपासून पाडण्यात येणार आहे. पर्यायी व्यवस्थेतील अडचणी आणि विविध कारणांमुळे रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पाडकामाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग, संरक्षक जाळी आणि पत्रे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

RelatedPosts

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!

सातारा हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथील बसस्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह विविध शहरांना जोडणाऱ्या या बसस्थानकाची जुनी इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे बसस्थानकाचा विकास करून ते अधिक प्रशस्त आणि सुसज्ज करावे, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून वारंवार करण्यात येत होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा केला होता.

खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर नवीन इमारतीच्या उभारणीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जुन्या इमारतीच्या पाडकामानंतर नवीन बसस्थानकाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत एसटीच्या विभागीय कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.

बसफेऱ्या आणि मुक्काम सुरू राहणार

जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू असताना प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर एसटी प्रशासनाचा भर आहे. कोणत्याही गावाची बसफेरी किंवा मुक्काम बंद न करता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे प्रवाशांना भविष्यात अधिक प्रशस्त आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. पाडकामाच्या काळात प्रवाशांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Ashok Chavan
Previous Post

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

Next Post

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

Related Posts

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
1
मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!
ताज्या घडामोडी

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

October 26, 2026
0
नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!

October 26, 2026
0
‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर
ताज्या घडामोडी

‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर

October 26, 2026
2
३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित
ताज्या घडामोडी

३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित

October 26, 2026
43
कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार
ताज्या घडामोडी

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

October 26, 2026
10
Next Post
धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

October 26, 2026
मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

October 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In