• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेळाडू ते मुख्य प्रशिक्षक; संकेता सावंतची यशस्वी भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
खेळाडू ते मुख्य प्रशिक्षक; संकेता सावंतची यशस्वी भरारी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

दोन सख्ख्या बहिणींचे ‘ईगल तायक्वांदो केंद्र’; संकेता राष्ट्रीय पंच, तर सईही ब्लॅक बेल्टधारक

रत्नागिरी (प्रतिनिधी) : इयत्ता चौथीत असताना तायक्वांदो या मार्शल आर्ट प्रकारात पाऊल ठेवणाऱ्या संकेता संदेश सावंत हिने तब्बल १८ वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून खेळाडू, मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच असा प्रेरणादायी प्रवास घडवला आहे. सुरुवातीच्या अडचणी आणि टीकेवर मात करत तिने क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

RelatedPosts

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरा बळी

न्यू इंग्लिश स्कूल, होडखाडचे विज्ञान प्रदर्शनात यश; द्वितीय क्रमांक पटकावला

रत्नागिरी शहरात दोन सख्ख्या बहिणी महिला प्रशिक्षिका म्हणून तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र चालवत असून, ‘ईगल तायक्वांदो केंद्रा’च्या माध्यमातून त्या मुला-मुलींना प्रशिक्षण देत आहेत. नाचणे रोड, अभ्युदय नगर येथे गेल्या दोन वर्षांपासून हे केंद्र सुरू आहे. संकेता मुख्य प्रशिक्षक, तर तिची धाकटी बहीण सई सावंत सहप्रशिक्षिका म्हणून काम पाहते.

टीकेवर मात करत पदकांची कमाई

शालेय वयात तायक्वांदोचे प्रशिक्षण सुरू करताना संकेताला सुरुवातीला भीती वाटत होती. मात्र, सरावातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर तिने पहिल्याच सुवर्णपदकापासून यशस्वी वाटचाल सुरू केली. ‘मुलांचा मारामारीचा खेळ’ अशा स्वरूपाच्या टीकेकडे दुर्लक्ष करत तिने जिल्हा, राज्य आणि विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवली.

संकेताने तायक्वांदोमध्ये द्वितीय डॅन (2nd Dan) ब्लॅक बेल्ट प्राप्त केला असून, राष्ट्रीय पंच परीक्षाही यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तिने अधिकृत पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

ज्या महाविद्यालयात पदक जिंकले, तिथेच विशेष सत्कार

संकेताने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यापीठ स्तरावर पदक मिळवले होते. त्याच महाविद्यालयात २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत तिने सलग तीन दिवस पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. तिच्या कामगिरीची दखल घेत या वेळी तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

धाकट्या बहिणीचीही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

संकेताच्या क्रीडा प्रवासातून प्रेरणा घेत तिची धाकटी बहीण सई सावंत हिनेही तायक्वांदोचे प्रशिक्षण सुरू केले. राज्य आणि विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या सईने प्रथम डॅन (1st Dan) ब्लॅक बेल्ट प्राप्त केला असून, राष्ट्रीय पंच परीक्षेतही यश मिळवले आहे.

दोन्ही बहिणींच्या मार्गदर्शनाखाली ‘ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रा’तील अनेक विद्यार्थी जिल्हास्तरीय आणि संघटनात्मक स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. तसेच बेल्ट परीक्षांमध्येही विद्यार्थी चांगली कामगिरी करत असल्याचे सांगण्यात आले.

मार्गदर्शक आणि कुटुंबाचा खंबीर पाठिंबा

संकेताच्या यशस्वी प्रवासात मिलिंद भागवत आणि शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संघटनेच्या स्तरावर जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, पंचप्रमुख भरत कररा, राम कररा, शशीरेखा कररा आणि प्रशांत मकवाना यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

संकेताचे वडील संदेश, आई सोनाली, आजी संपदा आणि आजोबा संभाजी सावंत यांनी तिच्या क्रीडाप्रवासाला नेहमीच प्रोत्साहन दिले. अभ्यासाच्या नावाखाली मुलींचा खेळ थांबवण्याऐवजी त्यांनी त्यांच्या आवडीला पाठबळ दिले. महागड्या शिकवणी वर्गांवर अवलंबून न राहता दोन्ही बहिणींनी पदवीपर्यंतचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करत क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्यही कायम ठेवले.

‘अभ्यासासोबत खेळालाही महत्त्व द्या’

आजच्या डिजिटल युगात मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मरक्षणासाठीही मैदानी खेळांची गरज आहे. मात्र, आठवी-नववी किंवा दहावी-बारावीच्या टप्प्यावर अभ्यासाच्या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थी खेळापासून दूर होतात, अशी खंत संकेता आणि सावंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.

खेळ ही केवळ तात्पुरती आवड नसून सातत्य, शिस्त आणि समर्पणाची वाट आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून विद्यार्थी शिक्षक घडतो, त्याचप्रमाणे दीर्घकाळाच्या मेहनतीतून खेळाडू आणि प्रशिक्षक तयार होतो. त्यामुळे पालकांनी मुलांवर केवळ गुणांचे ओझे न लादता त्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन संकेता आणि सावंत कुटुंबीयांनी केले.

संकेता आणि सई या बहिणींचा प्रवास मुलींच्या क्रीडा सहभागाचे, कौटुंबिक पाठबळाचे आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत आहे.

Ad 1
Tags: Rakesh Chilabe
Previous Post

न्यू इंग्लिश स्कूल, होडखाडचे विज्ञान प्रदर्शनात यश; द्वितीय क्रमांक पटकावला

Next Post

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

Related Posts

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक
ताज्या घडामोडी

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

October 29, 2026
3
वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरा बळी
ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरा बळी

October 29, 2026
0
न्यू इंग्लिश स्कूल, होडखाडचे विज्ञान प्रदर्शनात यश; द्वितीय क्रमांक पटकावला
ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल, होडखाडचे विज्ञान प्रदर्शनात यश; द्वितीय क्रमांक पटकावला

October 29, 2026
0
सोमर्डी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
ताज्या घडामोडी

सोमर्डी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

October 29, 2026
0
कर्जतमधील जंगलतोडीवरून राज ठाकरेंची राज्य व केंद्र सरकारवर टीका
ताज्या घडामोडी

कर्जतमधील जंगलतोडीवरून राज ठाकरेंची राज्य व केंद्र सरकारवर टीका

October 29, 2026
2
ताज्या घडामोडी

चालतवड येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

October 29, 2026
5
Next Post
कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

ताज्या बातम्या

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In