• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

सकल कुंभार समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचा विश्वास; पारंपरिक व्यवसायाच्या प्रश्नांवर वर्ध्यात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा

अकोट | प्रतिनिधी: महाराष्ट्रातील कुंभार समाजासाठी भाजपा सरकार लवकरच श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्ड कार्यान्वित करून समाजाला न्याय देईल, असा विश्वास सकल कुंभार समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी व्यक्त केला. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्धा येथे आयोजित परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

RelatedPosts

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

राज्य सरकारने कुंभार समाजासाठी ७०० ब्रासपर्यंत रॉयल्टी माफीसंदर्भातील परिपत्रक जारी केल्याने समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना मिळेल, असे गाते यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. आगामी काळात माती कला बोर्डाच्या स्थापनेसह कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील कुंभार व्यावसायिकांना माफक दरात इंधन उपलब्ध करून देणे, तेर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आराखडा तयार करणे आणि राज्यातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे, या मागण्यांचाही त्यांनी उल्लेख केला. सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१५ नोव्हेंबरला पुण्यात राज्यस्तरीय बैठक

सकल कुंभार समाज विकास परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक वर्धा येथील हरिराम टॉवर, मुरारका लॉन्स येथे संजय गाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आळा फाटा, पुणे येथे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विस्तृत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या आगामी बैठकीचे नियोजन, चर्चेचे विषय, संघटनात्मक बांधणी आणि परिषदेच्या पुढील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील कुंभार समाजाच्या प्रश्नांवर संघटितपणे पाठपुरावा करण्यावरही भर देण्यात आला.

गोरोबा काकांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे प्रमुख सरचिटणीस सुभाष तेटवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा आणि आगामी काळातील परिषदेची वाटचाल स्पष्ट केली. प्रदेश सरचिटणीस उत्तमराव मांजरमकर यांनी सूत्रसंचालन केले, तर वर्धा जिल्हाध्यक्ष वसंतराव जवळेकर यांनी आभार मानले.

यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. बैठकीला रमेशराव बुरबांदे, संपादक दिलीप खांडेकर, कारेगावकर, बबन लोणारे, अविनाश ठाकरे, संजय वाडकर, गणपतराव शेवाळकर, पुंडलिकराव रांजणे, ओमप्रकाश पांडे, राकेश प्रजापती, गणेश मोरे, किरणताई लंगोटे, राजाभाऊ सोनेने, अतुल वाडकर, विजय प्रजापती, आकाश संत्रे, अशोक सोनेने, ॲड. हरीष मंचलवार, अशोक चिरखरे, बबलू जुगेले, डेरे पाटील, अनिल गरपल्लीवार आणि संतोष कनोजे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी व विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे नेटके नियोजन केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Ssantosh Gaygole
Previous Post

खेळाडू ते मुख्य प्रशिक्षक; संकेता सावंतची यशस्वी भरारी

Next Post

वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरा बळी

Related Posts

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!
Blog

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
2
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता
Blog

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
2
दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!
Blog

दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

October 29, 2026
3
सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल
Blog

सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

October 29, 2026
1
जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
Blog

जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

October 29, 2026
1
Blog

कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरला, तर घोड धरणाचे १० नोव्हेंबरला सुटणार!

October 28, 2026
15
Next Post
वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरा बळी

वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरा बळी

ताज्या बातम्या

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In