सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रासह पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल; १ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण
पुणे : सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामती येथील सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना यंदाचा ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळ्या’त करण्यात येणार आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे हॉलमध्ये, भरत नाट्य मंदिराशेजारी हा सोहळा पार पडणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.











